मुळाक्षरे

  कुठल्याही भाषेची काही मुळाक्षरे । Mulakshare असतात, म्हणजे काही अशी मूलभूत अथवा प्राथमिक अक्षरे ज्यांच्यापासून शब्द बनतात अथवा बनवता येतात. त्यामुळे अशी मूलभूत अक्षरे कोणती, त्यांची वैशिष्ट्ये काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. इंग्रजी मुळाक्षरांना लेटर्स असे म्हणत जरी असले तरी आपल्या मराठी 'अक्षर' या शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे, 'ज्याचा नाश होत नाही असे' अक्षर असे कुठेतरी शाळेत असताना ऐकण्यात कि वाचण्यात आले होते पक्के आठवत नाही. असो.

मराठी मुळाक्षरे

मराठी मुळाक्षरे आपणां सर्वांना माहीतच आहेत, त्याबद्दल वेगळे सांगणे योग्य नाही. फक्त त्यामधून स्वर आणि व्यंजन कोणती आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे माहीत आहे का हि गोष्ट चेक करा.

मराठी स्वर

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ:

मराठी व्यंजन

क ख ग घ इत्यादी (आपल्याला माहित आहेतच.)

मराठी स्वरांची वैशिष्ट्ये

मराठी स्वर उदा. अ आ इत्यादी हे एकटे असतात म्हणजे त्यांना दुसऱ्या कोण्या अक्षराची गरज नसते अथवा त्यांच्यासोबत अथवा त्यांच्यामध्ये कोणते दुसरे अक्षर नसते.

मराठी व्यंजनांची वैशिष्ट्ये

मराठी व्यंजन उदा. क ख ग इत्यादी हे कधी एकटे नसतात म्हणजे त्यांच्यामध्ये स्वर असतो. उदा. क असेल तर त्याच्यामध्ये क् आणि अ असते.